उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली म्हणाणाऱ्या आजोबांचे निधन, वयाच्या ९६ व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

दिवाळी ही काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी आली सर्वांना मोती साबणाची आठवण येते, कारण तेव्हा मोती साबणाची जाहिरात आपल्याला बघायला मिळते. ही जाहिरात कित्येक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळत आहे.

या जाहिरातीमध्ये सकाळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच जेष्ठ कलाकार विद्याधर करमकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले आहे. विद्याघर करमकर यांची हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून ओळखले जायचे.

विद्याधर यांनी आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. मुंबईत विलेपार्ले या ठिकाणी ते राहत होते. त्यांना आबा म्हणूनही ओळखले जायचे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी आधी त्यांनी नोकरीही केली होती. नोकरी करताना ते अभिनय क्षेत्रात काम करत होते.

कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुमप खेर, सास बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, एक व्हिलन, एक थी डायन या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भुमिका निभावल्या होत्या. विशेष म्हणजे इतके वय असतानाही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली होती.

तसेच विद्याधर करमकर यांनी अनेक जाहिरातीमध्येही काम केले होते. इंडियन ऑईल, हेज्स टॉमेटॉ केचअप, लिनोओ, एशियन पेंट, अशा वेगवेगळ्या जाहिरांतीमध्ये त्यांनी काम केले होते, पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मोती साबणाच्या जाहिरातीतून मिळाली होती.

विद्याधर करमकर यांचे वय ९० असतानाही त्यांच्यात अभिनय करण्याच जोष होता. बऱ्याचदा त्यांनी त्यांची प्रकृती ठिक नसतानाही काम केले आहे. सोमवारी वयाच्या ९६ व्यावर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“संजय राऊत उद्धव ठाकरेंकडून पगार घेतात की शरद पवारांकडून, हे तरी त्यांनी सिद्ध करावं”
VIDEO; मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग, आवाज ऐकाल तर व्हाल मंत्रमुग्ध
पुण्यातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यु, गोव्यात फिरायला गेले असताना कार खाडीत कोसळली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.