आईसाठी काय पण! स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बरने छातीवर गोंदवले आईचे नाव

मुंबई | हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका निभावत घराघरात पोहचलेला अभिनेता प्रतीक बब्बर सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो.

प्रतीक बब्बरने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तु या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा प्रतीक  मुलगा आहे. प्रतीकच्या जन्मानंतर काही दिवसातच आई स्मिता पाटील यांचं निधन झालं होतं.

आईच्या निधनानंतर प्रतीकला नेहमी आईची आठवण होत असते. सोशल मिडियावर तो नेहमी व्हिडिओ शेअर करत असतो. आईच्या निधनानंतरही प्रतीक आई स्मिता पाटीलवर आजूनही प्रेम करत असल्याचं दिसून येत आहे.

प्रतीकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये पाहू शकता प्रतीक जमीनीवर झोपला आहे. त्याच्या पाठीमागे त्याचं कुत्र दिसत आहे. प्रतीकच्या छातीवर आईचे नाव स्मिता आणि त्यांचे जन्म वर्ष गोंदवलेले दिसत आहे.

कॅप्शनमध्ये प्रतीकने लिहले की, ‘माझ्या हृदयावर माझ्या आईचे नाव लिहले आहे. स्मिता फॉरएवर १९५५’. फोटोमध्ये प्रतीक बब्बर हा भावूक झाला असल्याचं दिसून येत आहे. प्रतीकच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

स्मिता पाटील या मराठमोळ्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनानंतर प्रतीकचा संभाळ  त्यांच्या आईवडीलांनी केला होता. प्रतीकने बागी-२, मुल्क, छिछोरे, मित्रो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रतीक बब्बर २०१९ मध्ये गर्लफ्रेंड सान्या सागर सोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता. सान्याने लंडमधून फॅशन कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. सान्या सागर ही साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करते.

महत्वाच्या बातम्या-
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत
करिअरमध्ये अक्षय,अजयपेक्षा मागे का राहिले सुनील शेट्टी; स्वतःच सांगितले ‘ते’ कारण
करोडोंच्या संपत्तीचा मालक झाला तरी ‘या’ व्यक्तीला नाही विसरला शाहरूख; आजही ते दिवस आठवल्यावर..

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.