तिकडे आई ४ दिवस करत होती मित्रांसोबत दारू पार्टी, इकडे बाळासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

मॉस्को। आई ही जगातील एकमेव व्यक्ती असते, जी आपल्या मुलांना आपल्या जिवापेक्षा जास्त प्रेम करते. ती तिच्या मुलांसाठी दिवसरात्र मेहनत घेऊन त्याच्या भविष्याचा विचार करते. स्वतः उपाशी राहून मुलांचं पोट भरते. मात्र मॉस्कोमध्ये एक महिला आपल्या मुलाच्या मृत्यूचं कारण बनली आहे.

महिलेच्या हलगर्जीपणामुळे 11 महिन्याचा मुलाचा मृत्यू झाला आहे. मिरर या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार या महिलेला मित्रांसोबत दारु पार्टी करायची होती. त्यामुळे तिने 11 महिन्याचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवले. चार दिवस भुकेने व्याकूळ झाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. तर मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या महिलेचे नाव ओल्गा बाजरोवा असे आहे. ओल्गा व तिचा पती वेगवेगळं राहतात. ओल्गा तिच्या दोन मुलांसोबत राहत होती. मात्र ओल्गाला तिच्या मित्रांसोबाबत पार्टी करायला जायचे होते. व त्यामुळे तिने आपल्या दोन मुलांना घरात चार दिवस कोंढून ठेवले.

त्यामुळे भुकेने 11 महिन्याचा मुलाचा मृत्यू झाला. व मुलगी बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिने मुलांच्या आजीशी संपर्क साधला.

आजीने घरी येताच नातीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि ओल्गाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली.या प्रकरणात कोर्टाने महिला दोषी असल्याचा निर्णय दिला आहे.

ओल्गाला अल्पवयीन मुलाची क्रुरतेनं हत्या करणे तसंच मुलीला धोकादायक अवस्थेत सोडून देत आईच्या कर्तव्याचे पालन करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप ठेवला आहे. व 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच मुलीचा ताबा आजीकडे दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.