VIDEO: बाळासोबत व्हिडिओ शुट करताना आई अचानक बनली घोडी; आईला असे पाहून बाळही लागले रडायला

सोशल मीडियार रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. काही व्हिडिओ हे हसवणारे असतात, तर काही व्हिडिओ धडकी भरवणारे असतात.

आता असाच एक हसवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला अचानक अचानक घोडी बनताना दिसते. पण आपल्या आईला असे बघून लहान बाळ रडायलाच लागतं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.

सध्या सेल्फी घेणं लोकांची हौस झाली आहे. लोकं कधीही सेल्फी घेत व्हिडिओ काढत असतात. आता असाच एका सेल्फी व्हिडिओचा प्रयत्न एका आईने केला होता. तिने आपल्या बाळाला कुशित घेऊन हा व्हिडिओ काढत होती, मात्र अचानक आपली आईला घोड्याचा चेहरा आल्यामुळे बाळ चांगलेच घाबरले आहे.

व्हिडिओमध्ये महिला आपल्या बाळाला कुशीत घेऊन व्हिडिओ शुट करत असते, अशातच अचानक तिचा चेहरा घोडीच्या चेहऱ्यामध्ये बदलतो. आईचा असा चेहरा पाहून चिमुकला खुप घाबरतो आणि रडायला सुरुवात करतो.

हा व्हिडिओ त्या महिलेने मजाक म्हणून बनवला होता. सध्या टेक्नॉलॉजीमुळे खुप काही शक्य झाले आहे. अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ऍपच्या माध्यमातून करता येत असतात. जे पाहून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो.

या महिलेने इन्स्टाग्रामवरच्या एका फिचरचा वापर करत हा व्हिडिओ तयार केला होता. मात्र मुलगा लहान असल्याने त्याला काही कळलेच नाही, त्यामुळे आपल्या आईचा असा चेहरा बघून चिमुकला चांगलाच घाबरला. त्यामुले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अफवा पसरवनाऱ्यांवर नट्टू काका चिडले, म्हणाले, मी कोणत्याही आर्थिक संकटात नाही
युट्युबरने निर्दयपणे कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवत काढला व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक
शाहरुखने कधीकाळी प्रियंकाला लग्नासाठी घातली होती मागणी, का नाही झाले त्यांचे लग्न? जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.