Share

Latur Crime : हृदयद्रावक! कॉलेज फीचे पैसे आईने सिलेंडरसाठी वापरले, संतापलेल्या मुलाने जन्मदात्या बापाचा निर्घृण खून केला; लातूरमधील हिंपळनेर हादरलं

Latur Crime :  लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर (Chakur) तालुक्यातील हिंपळनेर (Himpalner) गावात एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरवली आहे. 24 वर्षीय मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत देविदास पांचाळ (Devidas Panchal) वय 70 हे गरीब परिस्थितीत भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मुलाने चापोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेतल्यामुळे कॉलेज फीससाठी पैसे मागितले. मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतन भिजलेले होते, तसेच गॅस संपल्याने आईने गॅस सिलेंडर (Gas Cylinder) खरेदीसाठी पैसे खर्च केले. परिणामी कॉलेज फीची थोडीशी उणीव राहिली होती.

मुलाने वडिलांचा डोक्यावर काठीने हल्ला केला

रागाच्या भरात मुलाने घरातील काठी उचलून वडिलांच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या देविदास पांचाळ (Devidas Panchal) यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर (Chakur Rural Hospital) येथे दाखल केले असले, तरी गंभीर रक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे (Muralidhar Murkute), पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर (Ravindra Choudhar), पोलीस निरीक्षक बालाजी भंडे (Balaji Bhande) तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हिंपळनेर परिसरात ही घटना समाजमधील चर्चांना चालना देत आहे. नागरिकांच्या मते, “पोटासाठी झगडणाऱ्या वडिलांचा जीव मुलाने कॉलेज फीससाठी घ्यावा, ही अत्यंत दुःखद घटना आहे”.

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now