माते तुला सलाम! जीव मुठीत घेऊन गर्भवती महिलेने थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय; गोंडस मुलाला दिला जन्म

परभणी। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे, तर नदी नाले तुडुंब भरले आहेत. पावसाचा फटका हा जास्त ग्रामीण भागातील लोकांना बसला आहे. तसेच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे संपर्क तुटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

त्यात गावाच्या ठिकाणी जवळपास डॉक्टर किंवा रुग्णालयाची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अशातच आता या पावसात मराठवाड्यातून एक व्हिडीओ समोर आला आहे. परभणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून एका गर्भवती महिलेला थरमोकॉलच्या तराफ्यातून घेऊन जातांनाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथील गरोदर महिला शिवकन्या लिंबोरे यांना प्रसूती कळा येत होत्या. पण सलग तीन दिवस गावात जोरदार पाऊस सुरु असल्यानं पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शहराच्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था नव्हती.

तसेच नदी भरलेल्या पुराच्या पाण्यातून जाण्याशिवाय काही पर्याय नसल्यानं कुटुंबीयांनी धोका पत्करत नदीपात्रातून थर्माकोलच्या साहाय्यानं शिवकन्याला रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. मात्र सर्व गावांचे एकमेकांशी संपर्क तुटले होते.

अखेर वेदना थांबत नसल्याने कुटुंबीयांनी शिवकन्याला रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरवले व अखेर कुटुंबियांना थर्मोकोलचा तराफा अधिक सुरक्षित वाटला आणि पुराच्या पाण्यातून सदर महिलेला थर्मोकोलच्या तराफ्यात झोपवून नदी पार करीत रुग्णालयात नेण्यात आले. कुटुंबीयांनी ना इलाजास्तव गर्भवती महिलेला थर्माकोलपासून बनवण्यात आलेल्या तराफ्यावर झोपवून नदी पार करावी लागली.

या महिलेसोबत इतर ही काही महिलांनी देखील जीव मुठीत धरून पुरातून प्रवास केला. महिला वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती झाली आहे. तिने मानवत येथील एका रुग्णालयांमध्ये गोंडस मुलाला जन्म दिलाय. मात्र शिवकन्याला वेळेत उपचार न मिळाल्याने सिजर करावे लागले आहे. मात्र सध्या मूल व आई दोघेही सुखरूप आहेत. हा थरारक अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
महत्वाच्या बातम्या
एकेकाळी ‘या’ व्यक्तीची तोंडभरून स्तुती करणारी ऐश्वर्या आज ‘त्या’ व्यक्तीचा चेहरा देखील पाहत नाही कारण… 
धोनीची टी- 20 वर्ल्ड कपसाठी निवड का केली? गौतम गंभीरने सांगितले सगळ्यांच्या मनातले ‘ते’ कारण.. 
हवाई दल म्हणाले, धावपट्टीला दीड वर्ष लागतील; गडकरी म्हणाले, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो… 
धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव, सुनील गावसकरांनी सांगितले ‘ते’ कारण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.