आई ती आईच असते! पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई, पहा व्हिडीओ

आईची माया ही कोणालाही समजू शकत नाही. तुम्हाला जगात आईइतके प्रेम कोणीही करू शकत नाही. मग तो पशू असो किंवा पक्षी आईची ममता ही सारखीच असते. तिच्या मुलांवर संकट आलं तर ती कोणाचाही सामना करू शकते.

तिच्या मुलांना वाचविण्यात तिचा जीव गेला तरी चालेल पण ती आपल्या मुलांना वाचवतेच. मुक्या प्राण्यांमध्ये तसंच असते. सध्या सोशल मिडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक हरीण आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी आपल्यापेक्षा बलाढ्या प्राण्याला कशा प्रकारे भिडते हे तुम्हाला जाणवेल.

आपल्या पाडसाला वाचविण्यसाठी तिने जे केलं ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आपल्या पाडसाला वाचविण्यासाठी ही आई चक्क मगरीच्या तोंडात गेली. व्हिडीओमध्ये हरणाचं पाडसं नदीत उड्या मारत असतं. नदीत त्याच्यावर ताक लाऊन कोणीतरी बसलं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती.

त्याची आई त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मागे पळते. पाडसाला पाहताच मगर त्याच्या मागे त्याला खाण्यासाठी वेगाने त्याच्या जवळ येते. हरिणीला हे दिसतं आणि ती पाण्यात धावत येते. पाडसाची आई त्याच्या लांब राहून त्याच्या अवतीभोवती पळायला लागते.

ती एका जागी थांबते आणि आपल्या पाडसाला शेवटचं पाहून घेते. पाडसापासून आता आपण दूर होणार आहोत याची जाणीव तिला झालेली असते. ती पाडसाच्या आणि मगरीच्या मध्ये येते आणि स्वता शिकार होते. ती आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत नाही कारण तिने मुद्दाम आपला जीव धोक्यात घातला असतो. त्यामुळे तिच्या पाडसाचा जीव वाचतो.

संपुर्ण जगाची ताकद आईसमोर काहीच नाही. या व्हिडीओतून खुप काही शिकण्यासारखे आहे. ज्यांचे आपल्या आईवर प्रेम आहे त्यांचे डोळे नक्कीच भरून आले असतील. असे म्हणतात की देव स्वता पृथ्वीवर येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले आणि हे खरेच आहे.

महत्वाच्या बातम्या
भिडे गुरूंजीचे निकटवर्तीय नितीन चौगुलेंच शिवप्रतिष्ठानमधून निलंबन
कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचारी बेपत्ता; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप
IND Vs ENG : सिराजने धरला कुलदीप यादवचा गळा, ड्रेसिंग रूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
उद्धव ठाकरेंवर घाणेरडी टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसैनिकांनी धू धू धूतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.