नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलांची हत्या करून त्यांचे म्रुतदेह जाळले आहेत. यावेळी आईने हत्येचा पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी महिलेने स्वतःच्या आईची आणि भावाची (Brother) मदत घेत पोटच्या मुलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ( mother murdered two children nanded district )
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपींना अटक देखील केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावात हे हत्याकांड घडले आहे. क्रूर आईने आपल्या दोन मुलांची हत्या केली.
त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आईने त्या दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून टाकले. आरोपी महिलेचे नाव धुरपताबाई गणपत निमलवाड असे आहे. आरोपी महिला ३० वर्षांची असून त्या आपल्या पती आणि दोन मुलांसोबत पांडुरणा गावात राहत होत्या. आरोपी महिलेला एक दोन वर्षांचा मुलगा आणि एक चार महिन्यांची मुलगी होती.
मुलाचे नाव दत्ता गणपत निमलवाड असून मुलीचे नाव अनुसया गणपत निमलवाड असे आहे. ३१ मे ते १ जूनच्या दरम्यान सायंकाळी ६ वाजता आजूबाजूला कुणी नाही आहे हे पाहून आरोपी महिलेने आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली. त्यानंतर आरोपी महिलेने आपल्या भावाची आणि आईची मदत घेत मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी महिला ही मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात गावातील गोविंद दगडूजी निमलवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपी महिला, तिची आई आणि भावाला अटक केली आहे. या घटनेची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.
अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील महाडमधून देखील समोर आली आहे. महाड तालुक्यातील ढालगाठी या गावातील विहिरीत एका आईने आपल्या सहा मुलांना ढकलून देत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणात आईला अटक करण्यात आली असून पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीचा केकेचा व्हिडिओ लीक, cctv मध्ये कैद झालेले शेवटचे क्षण पाहून भावूक व्हाल
गायक केकेचा शेवटचा cctv व्हिडीओ आला समोर; पाहून तुमच्याही काळजात पाणी पाणी होईल
मांसबंदी झाल्यानंतर मुस्लिम मालकाने बदलले हॉटेलचे नाव, स्टाफ आणि जेवण; म्हणाला, ‘पर्याय नाही’