माय-लेकीचा एकच बॉयफ्रेंड; आईने काढला पोटच्या पोरीचा काटा  

आईने आपल्या प्रियकरांसोबत पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील सुभाष नगर परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी मृत मुलीच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

येथील रहिवासी अब्दुल मतीम यांनी पोलिसांना ही माहिती दिली. अब्दुल यांनी पोलिसांना कळवले की, ‘रात्री तीन वाजल्याच्या सुमारास दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांची मुलगी उसमा हिची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या आईला मुकिस बानोला धारदार शस्त्राने जखमी केले.

यानंतर आरोपींवर सुभाष नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेसाठी बरेलीचे पोलीस अधिकारी शैलेश कुमार पांडे यांनी चौकशीसाठी एक पथक स्थापन केले.

त्याच्या नेतृत्वाखाली या पथकाने अवघ्या तीन तासांत या हत्याचा खुलासा केला. आणि आरोपी मृत मुलीची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

प्रियकर कौशरने सांगितले की, ‘मृत मुलीची आई मुकिस बानोसोबत त्याने उसमाची हत्या केली. मुकिस बानोसोबत कौशरचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मृत उसमा सोबत देखील आरोपी कौशरचे अनैतिक संबंध होते, जे त्याच्या पत्नीला समजले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कौशरचे आधीच लग्न झाले होते. त्याला तीन मुले आहेत. मृत मुलगी उसमा आरोपी कौशरवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, पण कौशरला लग्न करायचे नव्हते.

त्यानंतर कौशरने उसमाच्या आईसोबत मिळून कट रचला आणि मग दोघांनी मिळून उसमा हिचा गळा दाबून हत्या केली. या घटनेची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.