महाराष्ट्र्रातील जळगावमधून(jalgaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधामध्ये अडचण निर्माण करणाऱ्या मुलाला आईने आणि तिच्या प्रियकराने ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मयत मुलाच्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.(mother killed their son with the help of boyfriend)
ही घटना जळगाव जिल्ह्यातील सावखेडा शिवार या गावातील जलाराम नगरात घडली आहे. या गावात विलास पाटील नामक व्यक्ती त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांची पत्नी मंगला पाटील हीचे गेल्या वर्षभरापासून प्रमोद शिंपी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांच्या अनैतिक संबंधामध्ये मुलगा प्रशांत पाटील अडसर ठरत होता.
यामुळे आईने व तिच्या प्रियकराने मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आईने मुलगा प्रशांत पाटीलला रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमिष दाखवले. हे आमिष दाखवत आई मंगला पाटील आणि तिचा प्रियकर प्रमोद शिंपी यांनी मुलाला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर गावाजवळच्या जंगलात नेले.
आई व तिच्या प्रियकराने मुलाला गळफास लावला आणि झाडाला लटकवून दिले. त्यानंतर मयत मुलाची आई त्या ठिकाणाहून पुन्हा जळगावला आली. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे विलास पाटील यांनी जळगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मयत प्रशांत पाटीलचा तपास सुरु केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना मयत मुलाच्या मोबाईलचे कॉल डिटेलची माहिती घेतली. त्या कॉल डिटेलवरून मुलाच्या मोबाइलवरून प्रमोद शिंपी यांना वारंवार फोन केल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदत घेत मयत मुलाचे लोकेशन शोधले. तेव्हा पोलिसांना मयत मुलाचे आणि प्रमोद शिंपीच्या मोबाईलचे लोकेशन एकच असल्याचे आढळून आले.
त्यानुसार पोलिसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद शिंपीला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी प्रमोद शिंपी याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान प्रमोद शिंपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणात मयत मुलाची आई मंगला पाटील हीचा देखील सहभाग असलयाचे दिसून आले.
यानंतर पोलिसांनी मयत मुलाच्या आईला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेची संपूर्ण जळगाव शहरात चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तीन जवानांनी विवाहित महिलेवर केला बलात्कार; अश्लील व्हिडिओ काढून दिली धमकी, नंतर झाले फरार
बिग बॉसच्या सेटवर दिसली सलमान आणि मिथुन दा ची मैत्री, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
VIDEO: वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने ‘या’ गाण्यावर केला डान्स, नेटकरी म्हणाले, ‘आम्हाला तुझी लाज वाटते’






