काय सांगता! प्रेमासाठी जावयासोबत पळून आली सासू, पुढे जे घडले ते वाचून बसेल धक्का..

पुणे । पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका जावयाने अनैतिक संबंधातून सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जावयासोबत ती कर्नाटकातून पळून आली होती.

पळून आल्यानंतर त्याच्यात सतत वाद होत होते, यातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जावयाला अटक केली असून चौकशी सुरू आहे. आसिफ आतार वय २५ या जावयासोबत ती बिबवेवाडी परिसरात काही दिवसांपासून राहत होती.

काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या आसिफचे आपल्या सासुवर प्रेम जडले, त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही बेळगावहून पुण्यात आले. त्यांचे सगळे सुरळीत सुरू असताना काही दिवसांपासून त्यांच्यात रोज वाद होत होते.

दररोज होणाऱ्या वादामुळे आसिफ वैतागला होता, यामुळे त्याने सासूची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो पळून गेला मात्र त्याने घडलेला प्रकार आपल्या मित्राला सांगितला. यामुळे त्याचा तपास लागला.

त्याच्या मित्राने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. आणि पोलिसांनी त्याला अटक केली. तो कर्नाटकमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. बिबवेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून ते फिरत असल्याने आसपास चर्चा सूरु होती.

त्या सासूचे वय ४५ असून त्यांनी दोघांच्या समंतीने हा निर्णय घेतला होता. पुण्यात ते मजूरी करून राहत होते. आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

टेलिव्हिजनवर मोठा ब्रेक मिळण्याअगोदर ‘या’ अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये केले आहे काम

जगातील सर्वात श्रीमंत जोडपं मायक्रोसाॅफ्टचे बिल आणि मेलींडा गेट्स घेणार घटस्फोट

गोलमाल फेम विकास कदमची बातच न्यारी; करतोय कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा भारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.