आई ती आईच! समुद्रात दोन मुलांसह अडकली, स्वत:ची लघवी पिऊन मुलांना पाजले दुध अन् शेवटी सोडला जीव

असे म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. कारण आई ही मुलांसाठी पहिले दैवत असते. कितीही संकटं येवो आई मुलांना त्या संकटातून सुखरुप बाहेर काढते. वेळ प्रसंगी ती आपल्या प्राणाची बाजी लावायलाही मागे पुढे पाहत नाही, अशीच एक घटना दक्षिण अमेरिकेतून समोर आली आहे.

समुद्रात अडकलेल्या एका आईने आपला जीव देऊन आपल्या मुलांचा जीव वाचवला आहे. इतकंच नाही, तर तिने स्वत:ची लघवी पिऊन मुलांना दूध पाजले आहे आणि त्यांना सुखरुपपणे या मोठ्या संकटात वाचवले आहे.

या आईचे नाव मैरिली चाकोन असे आहे. त्या ४० वर्षांच्या होत्या. मैरिली ही आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा, एक सहा वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी होती. तसेच त्यांची आया वेरोनिका होती.

३ सप्टेंबरला व्हेनुजुएलाहून टॉटुर्गासाठी जहाजाने निघाले होते. पण कॅरिबियनमध्ये त्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. त्यांचे जहाज अचानक तुटलं आणि ते डुबु लागलं. यातला जहाजाचा काही भाग आणि त्यामधलं फ्रीज तरंगत होतं.

या दुर्घटनेमध्ये मैरिली, तिची मुले आणि आया वाचले. जहाजाच्या तुटलेल्या भागाच्या मदतीने तरंगत राहिले. त्यांचा जीव तर वाचला होता, पण त्यांना प्यायला पाणी नव्हते आणि खायला अन्न नाही. मुलंही भुकेने व्याकूळ झाली होती.

आपल्या मुलांचा जीव जाताना ती पाहू शकत नव्हती म्हणून शेवटी मैरिलीने स्वत:ची लघवी पिली आणि ज्यामुळे तिच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. लघवी पिऊन तिने आपल्या मुलांना दूध पाजलं आणि त्यांचा जीव वाचवला.

रेस्क्यु टीमला वाचवायला येण्यासाठी चार दिवस लागले. तोपर्यंत मैरिलीचा मृत्यु झाला होता. तिची मुले आणि त्यांची आया जीवंत होती. पण ते तिघेही गंभीर अवस्थेत होते. ते तिथपर्यंत पोहचण्याच्या काही तासांआधीच तिचा मृत्यु झाला होता. मैरिलीचा मृत्यु शरीरात पाणी नसल्यामुळे झाला होता, आया आपला जीव वाचवण्यासाठी फ्रीजमध्ये लपली होती, तर मुलं आईच्या मृतदेहावर होती.

महत्वाच्या बातम्या-

चहासोबत खारी टोस्ट खाताय तर पाहा हा व्हिडिओ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल
पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून अमिताभ बच्चनने मागितली क्षमा; म्हणाले, पैसे भेटतात म्हणून करावी लागते
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.