जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुलाला तुरूंगातून पळवण्यासाठी आईने खोदले ३५ फूट लांबीचे भुयार

आई आपल्या मुलांवर खुप प्रेम करत असते. जन्मापासून ते मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांचा सांभाळ करत असते. आई आणि मुलांचं नातं घट्ट असतं. संकट काळात आई मुलांच्या बाजूने उभी राहत त्यांना लढण्याची नवी उर्जा देत असते. पण मुलाने चुक केल्यावर त्यांना रागवत सुध्दा असते.

आपल्या मुलांसाठी आई काहीही करायला तयार होत असते.  युक्रेनमध्ये एका आईने आपल्या मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी भन्नाट आयडिया शोधली. पण त्यामध्ये तिला यश आले नाही. उलट तिलाच जेलची हवा खायला लागली.

एका खूनाच्या गुन्ह्यामध्ये ५१ वर्षीय महिलेचा मुलगा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुलाच्या सुटकेसाठी महिलेने अनेक प्रयत्न केले. मात्र  मुलाची सुटका काही होऊ शकली नाही. अखेर तिने एक प्लॅग आखला आणि त्यानूसार तिने काम करण्यास सुरूवात केली.

मुलगा ज्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्या जवळच्या परिसरात महिलेने भाड्याने एक खोली घेतली. त्यानंतर रूमपासून ते जेलपर्यंत तिने भुयार खोदण्यास सुरूवात केली. महिलेकडे भुयार खोदण्यासाठी कुदळ फावडे यांसारख्या वस्तू होत्या.

महिलेचं भुयार खोदण्याचं रोज काम सुरू होतं. अवघ्या २१ दिवसामध्ये तीने ३५ फुट भुयार खोदले आणि अखेर ती जेलच्या जवळ पोहोचली. जेलच्या भींतीपर्यंत भुयार खोदल्यानंतर पोलिसांना काही तरी गडबड असल्याचं जाणवलं.

पोलिसांंनी पाहणी केली असता. त्यांना जेलच्या भींतीपासून थेट महिलेच्या घरापर्यंत भुयार खोदलं असल्याचं दिसलं.  त्यानंतर महिलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत तिची रवानगी जेलमध्ये केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टर नव्हे सैतान! तपासणीसाठी आलेल्या विवाहित महिलेवर डॉक्टरने दवाखान्यातच केला बलात्कार
मुलगी न्यासामूळे अजय देवगनवर आली होती झोपेच्या गोळ्या खायची वेळ; जाणून घ्या कारण
कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.