Share

Kolhapur News: अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना आईवर काळाचा घाला; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Kolhapur News:  कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या २७ वर्षांच्या रचना स्वप्नील चौगले (Rachana Swapnil Chougule) या आशा वर्कर महिलेनं आपल्या २० दिवसांच्या बाळाला दूध पाजत असतानाच अचानक जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.

रचना चौगले (Rachana Chougule) यांचा विवाह सात वर्षांपूर्वी स्वप्नील चौगले (Swapnil Chougule) यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक सहा वर्षांची मुलगी असून, अवघ्या २० दिवसांपूर्वी दुसऱ्या कनिचं कोल्हापूरात (Kolhapur) आगमन झालं. चिमुरडीचं स्वागत थाटात करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच घरात बारशाचा कार्यक्रम पार पडला होता, आणि बाळाचं नाव ‘पियुषा’ (Piyusha) असं ठेवलं होतं. सर्व काही आनंदात सुरू असतानाच बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास काळाने कुटुंबावर मोठा आघात केला.

रचना बाळाला दूध पाजत असताना ती अचानक निपचित झाली. बाळाच्या रडण्याने स्वप्नील यांचे डोळे उघडले. त्यांनी पत्नीला हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच हालचाल न झाल्याने तातडीने रचना यांना सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये (Savitribai Phule Hospital) नेण्यात आलं. पुढे त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये (CPR Hospital) हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत्यूपूर्वी उपचार सुरू करण्याची संधीच मिळाली नाही.

रचना या आशा वर्कर (Asha Worker) म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होत्या. त्यांची तब्येत यापूर्वी पूर्णपणे ठीक होती. त्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू हे कुटुंबीय व शेजाऱ्यांसाठीही मोठं धक्कादायक ठरलं आहे. विशेषतः, बाळाच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच हा काळा क्षण आल्याने साऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now