मैदानावरील खेळाडूंची मेहनत आपण सर्व पाहतो. पण टीम इंडियामध्ये असाही एक खेळाडू आहे ज्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीसोबतच आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूबद्दल सांगणार आहोत ज्याने वयाच्या १७ व्या वर्षी आई गमावली, त्यानंतर मोठ्या बहिणीने घराचा ताबा घेतला आणि आज हा खेळाडू जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे.(Mother, Players, Team India, Cricketer, Ravindra Jadeja,)
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी गुजराती राजपूत कुटुंबात झाला. २००५ मध्ये त्याची आई लता यांचे अपघाती निधन झाले. जडेजाच्या आईला त्याला क्रिकेटर बनवायचे होते. मात्र, जडेजाच्या आईला आपल्या मुलाला भारतीय संघाच्या जर्सीत पाहता आले नाही.
अंडर-१९ विश्वचषकाच्या एक वर्ष आधी २००६ मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्याने क्रिकेट जवळजवळ सोडले. रवींद्र जडेजाच्या आईच्या निधनानंतर त्याची मोठी बहीण नयनाने त्याला आधार दिला आणि कुटुंबाची काळजीही घेतली. त्यानंतर जडेजाने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
रवींद्र जडेजा हा क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याचे वडील एका खाजगी सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षक होते. त्याने आर्मी ऑफिसर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती पण जडेजाला क्रिकेटमध्ये रस होता आणि तो क्रिकेटमध्ये पुढे गेला. जडेजा हा अलीकडच्या काळात टीम इंडियाचा महत्त्वाचा दुवा आहे.
२००८-२००९ रणजी ट्राफीतील एका अप्रभावी खेळानंतर, ज्यात तो यष्टिरक्षकांच्या यादीत शेवटचा होता आणि फलंदाजीतील योगदानामध्ये साठव्या स्थानावर होता, जानेवारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ८ फेब्रुवारी २००९ रोजी मालिकेच्या अंतिम सामन्यात झाले जेथे त्याने ६० धावा केल्या, जरी भारत हा सामना हरला. २००९ च्या विश्व टी-२० मध्ये, जडेजावर इंग्लंडविरुद्धच्या पराभवात भारतासाठी आवश्यक धावगती न केल्याबद्दल टीका झाली होती.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: दिलीप कुमार यांच्या आठवणीत ढसाढसा रडल्या सायरा बानो, भारत सरकारकडे मागितला ‘हा’ सन्मान
या टीव्ही अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, जीन्सचे बटन खोलून केले बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फुटला घाम
रत्नागिरी हळहळलं! मुलाचं लग्न जुळत नव्हतं म्हणून आईनं उचललं धक्कादायक पाऊल