मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने आईने देखील प्राण सोडल्याची अतिशय दुर्दैवी घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र गावात शोकाकूळ पसरला आहे.
मुलीच्या मृत्यूनंतर एकाच दिवसात आईने प्राण सोडला.
यवतमाळ येथे महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे ही दुःखद अशी घटना घडली आहे. समाधान शिंदे आणि मीनाताई शिंदे हे हिवरा संगम येथे त्यांच्या मुलांसह राहत होते. वयाने केवळ ९ वर्षांची अपूर्वा हीचा अल्पशा आजाराने ५ सप्टेंबरला निधन झाले.
मुलीच्या मृत्यूचा धक्का मीनाताई शिंदे यांना सहन झाला नाही. आणि ७ सप्टेंबरला आई मीनाताई यांचा देखील मृत्य झाला. या घटनेने गावात शोकाचे वातावरण आहे. तसेच गावातील सर्वांना याचा धक्का बसला आहे.
शिंदे कुटुंबातील सलग दोन व्यक्तींच्या जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मीनाताई शिंदे आणि समाधान शिंदे यांचा एक मुलगी, एक मुलगा असा परिवार होता. तर हिवरा संगम ग्रामपंचायत मध्ये मीनाताई या सदस्य होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार आई मीनाताई आणि लेकीला किडनीचा त्रास होता. असे बोलले जात आहे. या आजारामुळे एकाच दिवसाच्या अंतराने आई आणि लेकीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेने हिवरा संगम येथे शोकाचे वातावरण निर्माण झाले असून गावकरी शिंदे कुटुंबासोबत त्यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.