गाई नव्हे आईच! आठव्या महिन्यापासून सई पिते गाईच्या आचळाने दूध, गाईचा लागलाय लळा..

सोलापूर । गाईला देवाचे रूप मानले जाते. आपण जेवढे प्रेम करेल तेवढेच प्रेम ही मुकी जनावरे आपल्यावर करत असतात. आता याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील केम गावात आला आहे. येथे दोन वर्षांच्या चिमुलकलीला तिच्या घरातील कपिला गाईचा लळा लागला आहे. यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

येथील तळेकर कुटुंबीयातील सई असे या चिमुकलीचे नाव असून, ती वयाच्या आठव्या महिन्यापासून थेट गाईच्या आचळाला तोंड लावून दूध पिते. सई ही कपिला गाईला आई म्हणून हाक मारते. तळेकर कुटुंबीय हे खिलार गायीचे संगोपन आणि संवर्धन करणारे गोसेवक आहेत.

तिचा वावर गाईजवळ असत, यामुळे तिला आचळातून दूध पिण्याची सवय लागल्याचे तिचे आजोबा सांगतात. गायीच्या दुधामुळे सईची शारीरिक वाढ चांगली आहे. ती लवकर चालायला बोलायला लागली. ती हुशार देखील आहे. तिचे आजोबा परमेश्वर तळेकर म्हणाले, सई आठ महिन्यांची असताना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आले.

गाईने तिला शांतपणे पान्हा सोडला आणि सई आईकडे जशी दूध पिते तशी सईला गाईची गोडी लागली. सईला भूक लागली की, ती गोठ्यात जाते आणि मुक्त गोठ्यात गाई बसलेली असली तरी ती उभा राहतो. तो क्षण बघण्यासाठी अनेकजण येतात.

आता सई २६ महिन्यांची झाली. आतापर्यंत चार गायी तिला दूध देत होत्या. आता ती स्वत: जाऊन गायीच्या आचळाने दूध पिते, असेही तिच्या आजोबांनी सांगितले. ती आता स्वतः जाऊन दूध पिते अनेकांना ते मोठे कौतुकाचे वाटते.

त्याच्या मुक्त गोठ्यात अनेक गाई बसलेल्या असतात. मात्र सई गेली की या गाई तिची जणू वाटच बघत असतात. कोणत्याही प्रकारची इजा तिला करत नाहीत. अगदी विश्वासाने ती या गाईसोबत खेळत असते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.