माझ्या आईची काळजी घ्या’ असा मेसेज पाठवून तरूणाने खडकवासला धरणात दिला जीव

तरुण व्यावसायिकाची आत्महत्या; चुलत भावाच्या मोबाईलवर पाठविला व्हाईस मेसेज
पुण्यामधील एका तरुण व्यावसायिकाने खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रशेखर गोपाळ पुजारी (वय ३१, रा. सोमवार पेठ पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.

चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुण उद्योजकाने माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून माझी गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या असा व्हाईस मेसेज चुलतभावाला पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या केली आहे.

पुणे पानशेत रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्याच्या कडेला धरणाच्या भिंतीवरून व्यावसायिकाने उडी मारून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी हजेरी लावून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.

चंद्रशेखर यांचा सोमवार पेठ येथे हातगाडीवर वडापाव आणि डोसा विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाच वाजता त्याने चुलत भावाला व्हाईस मेसेज पाठविला. हे चंद्रशेखरच्या चुलत भावाला कळल्यानंतर त्याने आणि नातेवाईकांनी चंद्रशेखरची शोधाशोध चालू केली.

तेव्हा त्यांना खडकवासला धरणाजवळ चंद्रशेखर पुजारी यांची टू व्हीलर दिसून आली. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यात चंद्रशेखर हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. चंद्रशेखरने आत्महत्या का केली यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेल नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.