व्हाईट गोल्ड आणि हिरे मोत्यांपासून बनवलेली हॅन्डबॅग जिची किंमत ऐकून धक्का बसेल

एखाद्या हॅन्डबॅगची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते? ५ हजार किंवा जास्तीत जास्त आपल्या माहितीप्रमाणे १५ हजाराच्या आतच असेल. पण इटलीत अशी एक हॅन्डबॅग आहे जीची किंमत एकूणच चक्कर येईल.

कारण या बॅगची किंमत चक्क ५२ करोड रुपये आहे. एवढे पैसे तर त्या बॅगेतसुद्धा बसणार नाहीत पण या बॅगची किंमत एवढी असण्यामागे एक कारण आहे. बोरिनी मिलानेसी या ब्रँडने ही बॅग बनवली आहे. या बॅगवर व्हाईट गोल्डपासून बनवलेली दहा फुलपाखरे आहेत.

तसेच अनेक मौल्यवान हिरे व रत्नांनी ही बॅग बनवली आहे. त्यामुळे हिची किंमत ६० लाख युरो इतकी आहे. भारतीय चलनात याचे ५२ करोड रुपये होतात. या बॅगेच्या किमतीमागे एक सामाजिक कारणही आहे. या बॅगेतील ७ कोटींची रक्कम ही समुद्राच्या स्वछतेसाठी वापरली जाणार आहे.

ब्रँडचे संस्थापक म्हणाले की, सध्या समुद्रात प्लास्टिक आणि इतर कचरा खूप वाढत आहे त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात प्लस्टिक व हॅन्डग्लोसची संख्या वाढत आहे. हा सर्व कचरा हटवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे.

हा सगळा आर्थिक भार या बॅगेतून उचलला जाईल असे ते म्हणाले आहेत. ही बॅग बनवण्यासाठी तब्बल १००० तास लागले आहेत. आणि या बॅगला समुद्राच्या पाण्यासारखा निळसर रंग देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्या’ एका घटनेने बदलून टाकले होते कॉमेडीयन शेखर सुमनचे आयुष्य

मेथी उत्पादनाचा खर्च ४४४० आणि मिळाले २९५०; शेतकऱ्याचा विदारक अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.