दुबईमध्ये मिळते जगातील सर्वात महाग रॉयल गोल्ड बिर्याणी, किंमत वाचूनच पोट भरून जाईल

जवळपास कोणालाही आपण जर विचारले की तुम्ही पैसे कशाला कमवता? यावर सगळेजण एकच उत्तर देतात खाण्यासाठी, फिरण्यासाठी, कपड्यासाठी पैसे कमावतो. आपल्या पैशातून जर आपल्या गरजा पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा काय फायदा.

तुम्ही खाण्याच्या वस्तूंवर जास्तीत जास्त किती खर्च केला असेल? किंवा तुम्ही किती खर्च करू शकतो? पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की दुबईमध्ये सगळ्यात महागडी बिर्याणी मिळते. बिर्याणीची किंमत वाचून तुम्ही बिर्याणी घेताना दहा वेळ विचार कराल.

जगात खाण्याची आवड असणारे लोक खूप आहेत. त्यांच्यासाठीच दुबईतील एका नावाजलेल्या रेस्टॉरंटने रॉयल बिर्याणी लॉन्च केली आहे. या बिर्याणीची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. या बिर्याणीला २३ कॅरेट सोन्यापासून सजवले जाते.

त्यामुळे या बिर्याणीचे नाव रॉयल गोल्ड बिर्याणी असे ठेवण्यात आले आहे. या खास बर्याणीत काश्मिरी मटण कबाब, जुनी दिल्ली मटण चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मुगलई कोफ्ते आणि मलाई चिकन असे सर्व पदार्थ या बिर्याणीत आहेत.

त्यासोबत रायता आणि सॉसही दिले जाते. जो कोणी ही बिर्याणी ऑर्डर करतो त्याला ४५ मिनिटांत ही बिर्याणी सर्व्ह केली जाते. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला एकट्याला ही बिर्याणी खावी लागेल पण तुम्ही ही बिर्याणी ६ लोकांसोबत शेअर करू शकता.

केसरच्या धाग्यापासून सजवलेली ही बिर्याणी दिसायला खूप सुंदर असते आणि तिची चव शब्दात सांगता येत नाही. रेस्टॉरंटने या बिर्याणीला आपल्या पहिल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मेन्यूमध्ये सामील केले आहे.

ही बिर्याणी खायची असेल तर खिसाही गरम असला पाहिजे. एकदा बिर्याणी खाल्ली की २० हजार गेलेच म्हणून समजा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.

महत्वाच्या बातम्या
रतन टाटा आहेत ‘या’ गाड्यांचे शौकीन, बघा त्यांचे कार कलेक्शन
‘माझी वाट लागली तरी चालेल पण त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही’; छत्रपती आक्रमक
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता
…आणि एलियनसारखं दिसण्यासाठी त्याने आपले ओठ, कान, नाक कापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.