इंजीनियर आहेत बॉलीवूडचे ‘हे’ चमकते सितारे; नाव वाचून धक्का बसेल

फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याअगोदर कलाकार अनेक काम करत असतात. त्यांनी अनेक ठिकाणी काम करून खुप मेहनत केली आहे. त्यानंतर त्यांना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला आणि ते स्टार झाले. पण बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर अनेक कलाकारांनी त्यांचे शिक्षण पुर्ण केले आहे.

त्यामूळे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक कलाकार उच्च शिक्षित आहेत. अनेकांनी तर इंजिनियरिंगमध्ये त्यांची डिग्री पुर्ण केली आहे. त्यानंतर ते बॉलीवूडमध्ये आले. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी त्यांचे इंजिनियएरिंगचे शिक्षण पुर्ण केले आहे.

१ सुशांत सिंह राजपूत – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज भलेही आपल्यामध्ये नसेल. पण तरीही त्याने लोकांच्या मनात खुप वेगळे स्थान निर्माण केले आहे. ज्यामूळे तो नेहमीच लोकांच्या लक्षात राहतो.

अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा सुशांत अभ्यासातही तेवढाच हुशार होता. त्याने दिल्लीच्या युनिवर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची डिग्री पुर्ण घेतली होती. इंजिनियरिंगचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयात प्रवेश केला होता.

२ विक्की कौशल – आजच्या घडीला बॉलीवूडमधला सर्वात दमदार अभिनेता म्हणून विक्कीला ओळखले जाते. त्याने खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये हे स्थान निर्माण केले आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील त्याला खुप जास्त मेहनत करावी लागली होती.

विक्की कौशलने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापुर्वी राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून टेलिकम्यूनिकेमध्ये डिग्री मिळवली होती. शिक्षण पुर्ण झाल्यानंतरच विक्की कौशलने अभिनयात प्रवेश केला होता.

३ तापसी पन्नू – तापसीने दिल्लीच्या युनीवर्सिटीमधून इंजिनियरिंगची डिग्री घेतली आहे. त्यानंतर तिने फिल्मी दुनियेत प्रवेश केला. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तापसीने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि ती टॉपची अभिनेत्री बनली आहे.

४ कृती सैनन – बॉलीवूडची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री कृतीकडे देखील इंजिनियरिंगची डिग्री आहे. तिने इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्यूनिकेशनमध्ये बीटेकची डिग्री घेतली आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अभिनेत्री बनली.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
‘राज’ चित्रपटातील अभिनेता आज करतो ‘हे’ काम; विश्वास बसणार नाही
हुबेहूब माधूरी दिक्षितच्या कॉपी आहेत बॉलीवूडच्या ‘य़ा’ अभिनेत्री; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत
‘आंखों मै तेरा ही चेहरा’ गाण्यातील अभिनेत्री आठवते का? तिची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.