या लोकांना डास जास्त चावतात, वाचा डासांबद्दल वैज्ञानिक आणि मनोरंजक माहिती

अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्यासोबत घडतात पण त्या का घडतात याचे उत्तर आपल्याला माहीत नसते. प्रत्येक गोष्टीमागे काहीना काही लॉजिक असते किंवा सायन्स असते. आता डास कधीकधी आपल्याला चावतात पण आपल्या शेजारी बसलेल्या आपल्या मित्राला किंवा इतर व्यक्तीला डास चावताना आपल्याला दिसत नाही.

यामागे काही कारणे आहेत जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमचा ब्लड ग्रुप O असेल तर डास या रक्तगटाकडे जास्त प्रमाणात आकर्षित करतात. कारण या रक्तातील विशेष घटक डासांना आकर्षित करतात. तसेच आपल्या त्वचेत लॅक्टिक ऍसिड आढळते.

जर त्याचे प्रमाण आवश्यकतापेक्षा जास्त असेल तर डास तुमच्या मागे हसत धुवून लागतील. शरीराचे तापमान जास्त असल्यास डास जास्त चावतात. व्यायाम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढते आणि डास त्यावेळी जास्त चावतात. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो त्याचा फायदा डासांना होतो.

शरीरातून कार्बनडायॉक्साईड बाहेर पडताना आपल्या शरीराचा गंध बाहेर पडतो आणि डास यावरून कोणत्या शरीराला शिकार करायचे ते ठरवतात. गर्भवती महिलांना डास जास्त चावतात कारण इतर स्त्रियांपेक्षा गर्भवती स्त्रियांचे तापमान जास्त असते.

जगात ३००० पेक्षा जास्त डासांच्या प्रजाती आहेत. त्यातील काही प्रजाती अशा आहेत त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. नर दास4 चावत नाहीत फक्त मादी डास चावतात. कारण मादी डासांना अंडी जलद तयार होण्यासाठी रक्त लागते.

महत्वाच्या बातम्या

बॉलीवूडचे खतरनाक खलनायक प्राण शेवटच्या दिवसांमध्ये ‘असे’ आयुष्य जगत होते

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये दया भाभीच्या कमबॅकवर परत एकदा प्रश्नचिन्ह कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.