मुंबई । बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने २०१८ मध्ये लग्न केले. ग्रीसमध्ये असताना निकने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. १ डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
प्रियांका ही निकबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. एका मुलाखतीत प्रियांकाने चक्क बेडरुम सिक्रेट सांगितले आहे. या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या मुलाखतीत ती म्हणाली, हे खरंच खूप त्रासदायक आहे, पण रोज सकाळी उठल्यावर निक माझा चेहरा सर्वांत आधी पाहण्याचा आग्रह धरत असतो. झोपेतून उठल्यावर किमान मला तोंड धुवू दे किंवा एखादा मॉइश्चराइजर तरी लावू दे असे माझे म्हणणे असते. पण ही तितकीच गोड गोष्ट आहे.
ही सवय अनेकांना असते, पतीने सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपला चेहरा पाहावा अशी अनेकांची इच्छा असते. निक देखील तेच करतो, असेही ती यावेळी म्हणाली.
२०१८ मध्ये जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. २०१७ पासून दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.