तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! इंकम टॅक्स डिपार्टमेंट करेल जप्त, वाचा नियम

नवी दिल्ली । भारतात इतर देशांच्या तुलनेत सोन्याला विशेष महत्त्व आहे. सोनं म्हणजेच सौंदर्य असे म्हटले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जाते. यामुळे सोन्याचे दर देखील जास्त आहेत. मात्र जास्त सोने खरेदी केले तर आपण अडचणीत येऊ शकतो, हे अनेकांना माहीत नाही.

यामध्ये सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या गाइडलाइननुसार एका निश्चित मर्यादेनंतर अधिक सोनं खरेदी करता येणार नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार जर तुम्ही सोने खरेदी केलं तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.

मर्यादेपेक्षा सोने खरेदी केल्यास तुमच्याकडे तपशील नसेल तर आयकर कायदा कलम १३२ अंतर्गत तुमची चौकशी होऊ शकते. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनेकजण गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात, याबाबत काही नियम आहेत.

आयकर नियमानुसार सोने कुठून आले, याचा पुरावा ती व्यक्ती देत असेल तर तीला घरात पाहिजे तितके सोने बाळगता येते. परंतु उत्पन्नाचा स्रोत न सांगता एखाद्याला सोनं घरात बाळगायचे असेल तर त्याला एक मर्यादा आहे.

यामध्ये दिलेल्या नियमानुसार विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि पुरुषांना १०० ग्रॅम सोनं कोणताही उत्पन्नाचा पुरावा न देता घरी ठेवता येईल. या नियमात सोनं घरात ठेवल्यास आयकर विभाग सोन्याचे दागिने जप्त करणार नाही.

याबाबत एका निवेदनात असे म्हटले आहे की, जर एखाद्या नागरिकाकडे वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यासह त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या सोन्याचे वैध स्त्रोत उपलब्ध आहेत, तसेच याचा पुरावा त्याला देता आला तर कितीही सोन्याचे दागिने आणि ऑर्नामेंट्स तो बाळगू शकतो. यामुळे आता तपशील द्यावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंनी घेतली चांगली मत;पण पाहावे लागले पराभवाचे तोंड

सकाळी एक कप चहा आणि सर्व आजारांपासून मुक्ती; जाणून घ्या कोणते पदार्थ मिसळायचे…

छतावर स्विमींग पूल, मिनी थिएटर; वाचा काय काय सुविधा आहेत सचिनच्या ८० कोटींच्या अलिशान बंगल्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.