Morbi bridge accident : गुजरातच्या मोरबी शहरात 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पूल कोसळून 134 जणांचा मृत्यू झाला. या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. आदल्या दिवशी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या खासगी कंपनीने सरकारची परवानगी न घेता तो पुन्हा खुला केला आहे.
या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यामध्ये एका आईची तीन मुल या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. हमने सु पिडा था ते हमने मालुम, एक काले जमा एतला आसू, दाबोयला चेन ना, जे बहार वोये आखु गुजरात डुबी जाये…’ ही व्यथा आहे राजेशभाई मुंचडिया यांच्या आईची. मोरबीच्या ऐतिहासिक झुलत्या पुलावरील दुर्घटनेला महिना लोटला तरी एका आईचे हृदयाची तळमळ होत आहे, जिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला.
सध्या विधानसभा निवडणुका सुरू असताना राजनीतीला घेऊन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी आहे. देशातील सिरॅमिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरबी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. महिनाभरापूर्वी येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध झुलता पूल अचानक कोसळला.
त्यात १३५ जणांचा मृत्यू झाला. 2017 च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या प्रेजसवाई मेरजा यांनी जिंकली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला. मोरबीच्या घटनेमुळे भाजपने त्यांना यावेळी निवडणुकीपासून दूर ठेवले. त्यांच्या जागी कांतीलाल अमृतिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जयंतीलाल पटेल हे आयएनसीचे तर संजय भातासा हे आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत. अपघातात पाण्यातून उडी मारून जीव वाचवणाऱ्या संगीता बेचरभाई परमा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मात्र निवडणुकीबाबत बोलले गेले असता ते म्हणाले, मी पुनर्जन्म घेतला आहे, त्यात आनंदी आहे, पण व्यवस्थेवर खूप नाराज आहे.
हा पूल मानवी निष्काळजीपणामुळे कोसळला आहे. असे अनेक प्रश्न मला पडले आहेत की, पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये असतानाही काम योग्य पद्धतीने झाले नाही, त्यामुळे सरकारवरील विश्वास उडाला आहे.
महत्वाच्या बातम्या
पुरूषांनो सावधान! महीलांकडे फक्त १४ सेकंद जरी पाहीले तरी होणार तुरूंगवासाची शिक्षा
sasun : “मी जगलो काय अन् मेलो काय फरक पडत नाही, डॉक्टरसाहेब माझी किडनी घ्या अन् मला दीड लाख द्या”
नुसती ताडतोड! ‘या’ फलंदाजाने फक्त 33 चेंडूत हादरवली दुबई, गोलंदाजांची कत्तल; पहा व्हिडीओ..