Share

Kerala : केरळमध्ये २७ मेला मान्सून पोहोचणार; महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Kerala : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा जलद गतीने सुरू झाला असून, तो २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी साधारणतः १ जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचतो. मात्र यंदा *अंदमान समुद्रात लवकर आगमन झाल्यामुळे संपूर्ण देशात मान्सून लवकर पोहोचण्याचा अंदाज* व्यक्त केला जात आहे.

अंदमानच्या समुद्रात मान्सूनची लवकर एन्ट्री*

भारतीय हवामान विभागाच्या शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, *१३ मेपर्यंत मान्सून अंदमान समुद्र, बंगालचा उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचेल*, असा अंदाज आहे. ही घडामोड म्हणजे यंदाच्या मान्सूनने वेग घेतल्याचे लक्षण मानले जात आहे.

२३ ते ३१ मे या कालावधीत केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता*

हवामान खात्याने स्पष्ट केले की, २७ मे ही संभाव्य तारीख असून त्यात ±४ दिवसांचा फरक गृहीत धरला जातो. म्हणजेच *२३ ते ३१ मे या कालावधीत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता* आहे. केरळमधून भारतात मान्सूनचं आगमन अधिकृत मानलं जातं आणि त्यानंतर संपूर्ण देशात त्याचा प्रवास सुरू होतो.

महाराष्ट्रात मान्सूनचा संभाव्य प्रवेश जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात*

*निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे* यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर *मुंबईत १० जूनच्या आसपास आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात – विशेषतः सह्याद्री ओलांडून – १५ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होईल*, असा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की, अरबी समुद्रातून मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती बळ आहे*, हे पाहूनच महाराष्ट्रात प्रत्यक्ष कोणत्या तारखेला मान्सून पोहोचेल, याबाबत अधिक स्पष्टता मिळेल.

मान्सून अंदाजाचे वैज्ञानिक निकष*

हवामान विभाग मान्सून आगमनासाठी खालील *६ वैज्ञानिक निकष* वापरतो:

1. वायव्य भारतातील किमान तापमान
2. दक्षिण द्वीपकल्पातील मान्सूनपूर्व सरी
3. इंडोनेशियातील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय वारे
4. ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील वारे
5. दक्षिण चीन समुद्रातील थर्मल रेडिएशन
6. उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटी दाब

या घटकांनुसार मान्सूनचा प्रवास मोजण्यात आणि वेळेचा अंदाज बांधण्यात येतो. मे महिना तुलनेने कमी तापदायक; अवकाळी पावसाची शक्यता* हवामान विभागाने सांगितले की, *१४ मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता* आहे. त्यामुळे या भागात *कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली राहण्याची शक्यता* असून, मे महिना तुलनेने *कमी तापदायक ठरेल*.

आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग सज्ज*

राज्यातील संभाव्य हवामान बदल लक्षात घेता, राज्य सरकारने *आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत.* प्रशासनाला सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदा लवकर पावसाळा – शेतीसाठी आणि थंड हवामानासाठी शुभवार्ता

यंदाचा लवकर येणारा मान्सून *शेतकऱ्यांसाठी दिलासादायक* असणार आहे. यामुळे खरीप हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. *उन्हाच्या झळा कमी होत नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा* व्यक्त केली जात आहे.
monsoon-to-arrive-in-kerala-on-may-27

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now