आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे; जाणून घ्या सविस्तर

मुंबई | व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. यामुळे भारतातील डिजिटल पेमेंट पद्धतीला आणखी बळ मिळेल असा विश्वास जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

यूनिफायइड पेमेंट इंटरफेस (UPI) म्हणजे काय?
यूनिफायइड पेमेंट इंटरफेस ही एक रियल टाईम पेमेंट सिस्टम आहे. ज्याने मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये पैसे त्वरित ट्रान्सफर करू शकतो. यूपीआयच्या माध्यमातून एका बँक अकाउंटला अनेक यूपीआय अ‍ॅप लिंक करू शकता. अनेक बँक अकाउंटला एका यूपीआय अ‍ॅपद्वारे ऑपरेट करता येतं.

दरम्यान, भारतात आजच्या तारखेला तब्बल ४० कोटी जण व्हॉट्स ऍप वापरत आहेत. त्याचवेळी गुगल पेचे भारतात साडे सात कोटी आणि फोन पेचे ६ कोटी ग्राहक आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच झाल्यामुळे यूपीआय पेमेंट मार्केटमध्ये फोन पे, पेटीएम, गुगल पे यांना मोठी टक्कर मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या काळात हेल्दी आणि फिट हृदयासाठी ‘हे’ करा सोपे उपाय
अशी गेली अर्णबची तुरूंगातली पहीली रात्र; मच्छरांनी फोडल्यानंतर तळमळत होता..
…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.