पैसे खूप खर्च होत आहेत? जाणून घ्या, पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…

आपण बघत असतो की अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसे येत असतात. पण त्यांच्याकडे पैसे टिकत नाहीत, कुठल्याही मार्गाने ते पैसे आपल्याकडून निघून जातात. यामुळे जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याकडे पैसे उपलब्ध होत नाहीत. अशावेळी मोठी अडचण निर्माण होते.

कोरोना काळात तर सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. कोट्यवधी लोक या काळात बेरोजगार झाले आहे. त्यामुळे पैशांचे व्यवस्थापन आता प्रत्येकासाठी महत्वाचे झाले आहे. तुमचे तुमच्या बचतीवर, खर्चावर, यासह सर्वच गोष्टींवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

बचत करणे कठीण किंवा कंटाळवाणे नाही. कधीकधी आपल्याला फक्त चौकटीच्या बाहेर थोडा विचार करण्याची आवश्यकता असते. आपल्याकडे सकारात्मक प्रोत्साहन आणि कल्पना अनंत आहेत. याचा योग्य प्रकारे वापर करणे गरजेचे आहे.

तसेच पर्सनल कम्पॅरिझन साइट फाइंडर डॉट कॉमचे सीईओ जॉन ओस्टलर म्हणाले, कोविड 19 संकट हे तुमच्या आर्थिक पुनर्मूल्यांकनाची संधी असू शकते. कोरोनानंतर अनेकांनी आपले जीवन बदलले आहे. अनेकजण बचत करत आहेत.

यामध्ये खरेदी छंद म्हणून खरेदी करू नका, मर्यादा निश्चित करा, सेकंड हॅन्ड खरेदी करा, लाईफलायडआऊटचे संस्थापक रॉजर मा यांनी सांगितले की कॅश-बॅक शॉपिंग पोर्टलचा वापर केल्यानेही तुमचे पैसे वाचतील. पैसे वाचवणारे अँप्स वापरा.

तुम्हाला स्वतःला वस्तूंची गरज आहे का? की फक्त आवडतं म्हणून खरेदी करता? असा प्रश्न स्वतःला विचारा. यामुळे तुम्हाला तुमची गरज लक्षात येईल. तुम्ही कमी पैशात चांगले ब्रँड सेकंडहँडमध्ये घेऊ शकतात, अशा पध्दतीने तुमचे पैसे वाचतील.

ताज्या बातम्या

जगातील अशी ६ ठिकाणं जिथे कधीच होत नाही अंधार; रात्रीच्या १२ वाजताही चमकत असतो सुर्य

‘या’ कारणामुळे अजय व काजोल देवगणच्या मुलीला जावं लागलं परदेशी; काजोलने सांगितलं यामागचं धक्कादायक सत्य

अभिनेता शाहरुख खान मुलगा व मुलगीमध्ये करतो भेदभाव; एका प्रश्नामुळे सत्य आलं समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.