फी भरायला नव्हते पैसे, आईने ठेवले घर गहाण, पोराने IAS होऊन केले नाव..

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील राजेश पाटील २००५ मध्ये ओरिसा कैडरचे आयएएस अधिकारी झाले. मात्र त्यांनी यासाठी काय काय केले आहे, किती संघर्ष केला हे अनेकांना माहिती नाही. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले. मात्र त्यांनी मोठे नाव कमावले आहे. अनेकांसाठी ते आज प्रेरणास्थान झाले आहेत.

एक काळ असा होता की, लहानपणी त्याच्या अभ्यासासाठी फी भरणे शक्य नव्हते, पण त्यांच्या आईने त्यांना अभ्यास सोडायला सांगितला नाही, यासाठी आईने खुप कष्ट केले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांचे घर गहाण ठेवावे लागले. मात्र ते कधी अभ्यासात मागे राहिले नाहीत.

आई म्हणाली, बाळा तू फक्त अभ्यास कर आणि सर्व काही ठीक होईल. आणि त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. ते सांगतात की, माझ्या लहानपणी मला समजले होते की या दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण. यामुळे आता तेवढेच काम करायचे असे त्यांनी ठरवले.

यासाठी माझी आई माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा होती. माझ्या पालकांनी माझा अभ्यास चालू ठेवला आणि आज मी या टप्प्यावर पोहोचलो आहे. राजेश पाटील, २००५ ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी यांनी नुकतेच “Tai Mi Collector Vhaynu” नावाचे पुस्तक लाँच केले आहे ‘आई मी कलेक्टर झालो’.

यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एक आई आपल्या मुलांसाठी कायम काय करू शकते, हे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी देखील रात्रीचा दिवस करून अभ्यास केला, आणि मोठे यश मिळवून आईच्या कष्टाचे चीज केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.