मुंबई | केंद्र सरकारकडून फास्ट टॅगची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी १५ फेब्रूवारी पर्यंत देशातील सर्व वाहनांना फास्ट टॅक बसवण्याची मूदत देण्यात आली होती. वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत व्हावी यासाठी फास्ट टॅगचा नियम लागू करण्यात आला होता.
आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल, किंमत आहे फक्त…
मूदत संपुनही अनेकांनी वाहनांना फास्ट टॅग लावलं नसल्यानं टोल नाक्यांवर दुप्पट पैसे वसूल केले जात होते. अनेकांनी फास्ट टॅग लावूनही काही तांत्रिक अडचणींमूळे फास्ट टॅग व्यवस्थित काम करत नसल्याने अनेकांना टोलवर बराच वेळ थांबावं लागत होतं आणि नाईलाजाने दुप्पट पैसे द्यावे लागायचे. मात्र आता केंद्र सरकारकड़ून आदेश जारी करण्यात आला आहे.
शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…
यामध्ये तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये पैसे असतानाही जर स्कॅन झाला नाही तर पैसे न देता तुम्ही जावू शकता. या आदेशामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपुर्वी गायक संदीप खरे यांनी फास्ट टॅगमध्ये पैसे असतानाही टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने झालेला त्रास सोशल मिडियावर सांगितला होता.
‘पंपावर मोदींचा आधी हसरा फोटो, नंतर मास्क, आता वाटतं मोदींच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी’
कार घेऊन जात असताना टोल नाक्यावर तांत्रीक अडचणीमुळे फास्ट टॅग स्कॅन झाला नाही. मग टोल कर्मचाऱ्यानी मला टोलची रक्कम आणि दंड भरायला लावला. मात्र मी दंड भरण्यास नकार दिला आणि काही वेळाने पुन्हा फास्ट टॅग स्कॅन केल्यावर त्यातून पैसे कट झाले. पण यामध्ये माझा बराच वेळ गेला. यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
स्वत:ची फसवणूक टाळा! ‘या’ कंपनीकडून वाहन इन्शुरन्स घेऊ नका, IRDAI चा इशारा
आता फास्ट टॅग असतानाही जर स्कॅन झाला नाही तर तुम्हाला पैसे न देताही वाहन घेऊन जाता येणार आहे. असा आदेश काढण्यात आला आहे. खरंतर हा आदेश २०१८ मध्येच जारी करण्यात आला होता. पण याबाबत अनेकांना माहिती नव्हती. एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.