Share

Dassehra Gathering : ‘दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला दिल्लीतून पैसा पुरवला जातोय’

Eknath Shinde

Dassehra Gathering : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट सज्ज झाले आहेत. तसेच दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु करण्यात आली आहे. नुकतेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे टीझरही लॉन्च करण्यात आले आहेत.

तसेच अनेक ठिकाणी बॅनरही लावण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला दसरा मेळाव्याच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे. हे बॅनर मातोश्रीबाहेर लावण्यात आले आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या बॅनरमध्ये “एक संघटना, एक विचार, एकच मैदान, शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या….! खूप खूप शुभेच्छा,” असे लिहिण्यात आले आहे. यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्रात तीन हजार बस येत असल्याची बातमी आम्ही वाचली. या सगळ्यासाठी भाजप पैसा पुरवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच हा पैसे दिल्ल्लीतून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, यांना फक्त दोन महिने झाले आहेत. अजून यांचा पक्ष नाही, संघटनेची नोंद नाही आणि अधिकृत मान्यताही नाही तर हा पैसे येतो कुठून?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपकडून शिंदे गटाला पैसे पुरवले जात असल्याचा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचेही महेश तपासे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी चुरस रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या
udhav thackeray : दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा चर्चा मात्र आनंद शिंदेंची; वाचा काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन?
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now