मोनालिसा झाली तानाजीवर फिदा, फोटो शेअर करत म्हणाली..

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मोनालीसा बागल. तिने आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या अभिनय कौशल्यावर अनेकांना प्रेम करण्यासाठी भाग पाडले. मोनालीसा सध्या एका चित्रपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी टॉकीज प्रस्तुत गस्त या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. तानाजी गालगुंडे आणि मोनालीसा बागल ही जोडी पहिल्यांदाच आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. दोघेही उत्तम कलाकार असल्याने चित्रपट बघण्यासारखा असणार आहे.

तानाजीला आपण सैराट चित्रपटापासून ओळखतो. त्याने त्यामध्ये बाळ्याची भूमिका साकारली होती. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासारखी असणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल सांगताना मोनालीसा म्हणाली की, मी गस्त या चित्रपटात सुजाता नावाची भूमिका करत आहे.

ती खूप चंचल मुलगी आहे. ती अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याला भेटण्यासाठी ती कोणत्याही प्रकारचा बहाणा बनवते. मी पहिल्यांदा तानाजीसोबत काम केले आहे आणि त्याच्यासारखा उत्तम कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता.

तसेच तानाजी म्हणाला की, मी या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात तो राहतोय त्या गावात राहत असताना तो त्या मुलीला चोरून भेटत असतो.

त्यांच्या प्रेमकथेत पुढे अनेक वळणे येतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मी गावाकडच्या मुलाचा अभिनय करत आहे आणि हा अभिनय प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

महत्वाच्या बातम्या
विराटच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनुष्काने ‘तो’ फोटो शेअर करत , म्हणाली….
माधूरी दिक्षितचे मेकअप शिवाय फोटो बघून तुम्हाला येईल चक्कर; ओळखणे आहे कठिण
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार? मोहन भागवतांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट
काकांच्या शेवटच्या क्षणांमध्ये डिंपल कपाडियाने नाही तर ‘या’ व्यक्तिने दिली होती त्यांची साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.