वाह! एका पंक्चरवाल्याने रूग्णालयांना दान केले तब्बल ९० आॅक्सीजन सिलेंडर

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांचा तुडवडा निर्माण होत आहे.

अशा परिस्थितीत अनेक उद्योगपती, अनेक नागरीक लोकांच्या मदतीला धावून येत आहे. अनेक लोकांनी माणूसकी दाखवत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशाच एका माणसाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या एक पंक्चरवाला कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरला आहे. या माणसाने कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळावे यासाठी ९० सिलेंडर प्रशासनाला दिले आहे. या माणसाचे नाव रियाज मोहम्मद आहे.

६० वर्षांच्या या आजोबांचे श्योपुर जिल्ह्यात एक पंक्चरचे दुकान आहे. असे असतानाही त्यांनी कोरोना रुग्णांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. मोहम्मद यांनी ९० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलेंडर जमा प्रशासनाला दिले आहे.

त्यांनी पंक्चरच्या दुकानासोबतच ऑक्सिजन सप्लायचा छोटा व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे त्यांना माहित होते, की कोण ऑक्सिजन सिंलेडरचा वापर करतात आणि मोहम्मद यांनी त्या लोकांकडून सिलेंडरची मागणी केली.

रियाज मोहम्मद यांनी त्या लोकांकडून ऑक्सिजन घेण्यास सुरुवात केली आणि ते ऑक्सिजन प्रशासनाला दिले. आतापर्यंत ९० सिलेंडर जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्या परीसरातल्या तहसीलदार राकेश श्रीवास्तव यांनीही रियाज मोहम्मद यांच्या कामाचे कौतूक केले आहे. तसेच मोहम्मद यांनी प्रशासनाला मोठी मदत केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या समाप्तीनंतर विराट कोहली युवा सेनेसोबत उतरणार कोरोना लढ्यात
“देशाला कोरोनाविरुद्ध लढायचे असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावाच लागेल”
७१ वर्षाच्या वयातही आजी करतेय खतरनाक वर्कआऊट; वर्कआऊटचे वजन पाहून तोंडात बोटं घालाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.