Share

रोहित शर्मा पारस आहे पारस, त्याच्यापासून लांब राहा नाहीतर.., माजी भारतीय खेळाडूने दिला इशारा

rohit shrma

रोहित शर्माने(Rohit Sharma) संघाच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर टीम इंडिया अतिशय वेगाने यशाची शिखरे सर करत आहे. रोहित शर्मा ज्या खेळाडूच्या हातात बॅट देतोय, तो खेळाडू चौकार आणि षटकार मारत समोरच्या संघाला हैराण करत आहे. तसेच रोहित शर्मा जेव्हा एखाद्या खेळाडूला चेंडू देतो तेव्हा तो विकेट घेण्यास सुरुवात करत आहे. एवढेच नाही, तर तो कर्णधार होताच टीम इंडिया २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-20 क्रमवारीत नंबर एकची टीम बनली आहे.(mohmmad kaif tweet  rohit sharma captaincy)

त्यामुळेच भारतीय चाहते कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मोहम्मद कैफने(Mohmmad Kaif) देखील रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. पण माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने रोहित शर्माचे कौतुक करत असताना इतर खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे.

मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या बाबतीत एक ट्विट केलं आहे मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक करत असताना टि्वटमध्ये लिहिले आहे की, “रोहित शर्मासोबत काळजीपूर्वक हस्तांदोलन करा. आजकाल त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने होतं आहे. श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली, खेळाडूंच्या क्रमवारीत बदल केले, गोलंदाजीत बदल केले. त्याचे सर्व निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले आहेत. त्याने सर्व खेळाडूंना गोल्डन टच दिला आहे.”

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने याआधी न्यूझीलंडला टी-20 मालिकेत ३-० अशा मोठया फरकाने नमवले. तर वेस्ट इंडिजचा एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही मालिकेत ३-० ने पराभव केला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.

आज श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर टी-20 फॉरमॅटमधील भारताचा हा सलग १२ वा विजय असणार आहे. या विजयामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानच्या विश्वविक्रमांची बरोबरी करणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. या टी-20 मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांनी शानदार खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने झंझावती नाबाद खेळी करत ७४ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :-
राजकारण तापलं! राज्यपालांविरोधात कॉंग्रेस आक्रमक; ‘मोदीजी.. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही’
राज्यपाल कोश्यारींचे शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; महाराष्ट्रातील जनता संतापली
मोठी बातमी! संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण; वर्षा बंगल्यावर पार पडणार बैठक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now