Share

‘नवाब मलिक जबरदस्तीने मुलींकडून करून घ्यायचे ‘हे’ काम, माझ्याकडे व्हिडीओ’, भाजप नेत्याचा दावा

nawab-malik

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.(mohit kambhoj statement on nawab malik)

नवाब मलिक हे डान्सबार चालवायचे, बांगलादेशातून(Bangladesh) मुली आणायचे आणि वेश्याव्यवसाय करायचे, असा सनसनाटी आरोप भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात आपल्याकडे पुरावे आहेत, असे मोहित कंबोज यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

या पत्रकार परिषदेत भाजप नेते मोहित कंबोज म्हणाले की, “राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवत होता. बांगलादेशमधून मुली आणून मुंबईत वेश्याव्यवसाय करायचं काम नवाब मलिक करत होते. अशा अनेक मुलींचे स्टिंग ऑपरेशन केलेले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. या व्हिडिओमध्ये मुलींनी कबूल केलं आहे की, नवाब मलिक जबरदस्तीने त्यांच्याकडून मुंबईत हे काम करून घेत होते.”

मोहित कंबोज पुढे म्हणाले की, ” लवकरच मी हे सगळे व्हिडिओ तपास यंत्रणांना देणार आहे. एक मंत्री ड्रग्ज, वेश्या व्यवसायात सामील आहे. त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्तीं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा आजच्या आज राजीनामा घ्यावा”, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.

ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. त्यानंतर नवाब मलिकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात मंत्री नवाब मलिकांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘नवाब मलिक बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय करायचे’, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
त्यांनी कायदेशीर मार्ग स्विकारला आहे त्यामुळे.., पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मांजरेकरांची प्रतिक्रिया
..त्यावेळी माझं रक्त पिणारा मच्छर देखील तडफडून मरायचा, संजय दत्तचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now