खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…

मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील सी-ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आला. आता नुकताच डेलकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.

तसेच याबाबत पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डेलकर यांच्या शवविच्छेदन अहवालात श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची नोंद आहे. फास लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.

डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुसाइड नोट गुजरातीत लिहिलेली आहे आणि तब्बल १५ पानांची ही चिठ्ठी आहे. या चिठ्ठीत अनेक मोठ्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खासदारांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणातला गुंता वाढला आहे.

दरम्यान, मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

महत्त्वाच्या बातम्या
जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा
बाबा रामदेव यांना अटक होणार? WHO म्हणते, ‘आम्ही प्रमाणपत्र दिलं नाही’
करोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा; IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.