मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार? मोहन भागवतांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी सकाळी सकाळी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मिथुन यांचा बंगला मुंबईच्या मढ भागात आहे. मिथुन हे मुळचे बंगाली अभिनेते आहेत आणि बंगालमध्ये त्यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. आणि सध्या बंगाल निवडणुक जवळ आली असताना मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतल्याने असे बोलले जात आहे की मिथुन चक्रवर्ती हे बंगाल निवडणुकीत भाजपचा नवीन चेहरा असतील.

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारे मिथुन आजही तितकेच लोकप्रिय आहेत. मिथुन यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली की, मोहन भागवत यांच्यासोबत मी आध्यात्मिक अंगाने जोडलो गेलो आहे.

याआधी लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना अशी विनंती केली होती की त्यांनी एकदा माझ्या घरी भेट द्यावी. अशी त्यांना मी विनंती केली होती, असे मिथुन म्हणाले आहेत.

मिथुन यांनी राजकीय पुर्नप्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे आणि ते असेही म्हणाले की मी भाजपात प्रवेश करणार नाहीये. असे काहीही अंदाज लावू नका, तसे काहीही घडलेले नाही असे मिथुन म्हणाले आहेत. त्यांनी याआधीही नागपूरमध्येही आरएसएस प्रमुखांची भेट घेतली होती.

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती राज्यसभेत खासदार राहून गेले आहेत. ते बराच काळ बंगालमधील सध्याचा सत्ताधारी पक्ष तृणमुल कॉग्रेसमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. या अशा अचानक भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या
काकांच्या शेवटच्या क्षणांमध्ये डिंपल कपाडियाने नाही तर ‘या’ व्यक्तिने दिली होती त्यांची साथ
मराठी पाऊल पडते पुढे! ५ महिन्याच्या तिरा कामतसाठी ‘हा’ मराठी अभिनेता सरसावला
किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे, आई बाबांना भेटू..
बाहुबली प्रभासला लॉकडाऊनचा जबर फटका, कंपनीवर आहे १००० कोटींचे कर्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.