कुणाचेही धर्मपरीवर्तन करणे हा आमचा उद्देश नाही; आम्हाला फक्त…; मोहन भागवतांचे वक्तव्य

भारताला विश्वगुरु बनवायचे असेल, तर आपण सर्वांनी एकत्र वाटचाल केली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांची शिकवण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या पूर्वजांच्या सद्गुणांची आठवण करून देणाऱ्या भारताला संपूर्ण जगाला शांती आणि आनंद देणारा विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सामंजस्याने आणि समन्वयाने पुढे जाऊ, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

मुंगेली जिल्ह्यातील मडकू बेटावर घोष शिबिराच्या समारोप समारंभात मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, ‘सत्यमेव जयते नानृतम्. सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. असत्याने कितीही प्रयत्न केले तरी असत्य कधीच जिंकत नाही.

मुंगेली जिल्ह्यातून वाहणाऱ्या शिवनाथ नदीत असलेल्या मडकू बेटावर १६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत घोष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या घोष शिबिरासाठी मोहन भागवत यांनाही बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मोहन भागवत म्हणाले, ‘येथे विविधतेत एकता आहे आणि एकात्मतेत विविधता आहे. भारताने कधीही कोणाचेही वाईट केले नाही. पूर्वी आपले पूर्वज येथून जगभर गेले आणि त्यांनी तेथील देशांना वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव करुन दिली. सत्य, धर्म शिकवला. पण आपण कधीही कोणाला बदलले नाही, ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडेच राहू द्या.

आम्ही त्यांना ज्ञान, विज्ञान, गणित आणि आयुर्वेद दिले आणि सभ्यता शिकवली. म्हणूनच आपल्याशी लढलेले चीनचे लोक सुद्धा २००० वर्षांपूर्वी भारताने चीनवर आपल्या संस्कृतीचा प्रभाव प्रस्थापित केला होता, हे सांगायला मागेपुढे पाहत नाही कारण त्या प्रभावाची स्मृती सुखद आहे, दुःखाची नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, जग फक्त दुर्बलांनाच मारते. स्वामी विवेकानंद म्हणाले की, दुर्बलता हे पाप आहे. मजबूत असणे म्हणजे संघटित होणे. एकटा माणूस मजबूत असू शकत नाही. कलियुगात संघटना ही शक्ती मानली जाते. सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत, कोणाला बदलण्याची गरज नाही. धर्म परिवर्तन करणे आमचा उद्देश नाही, आम्हाला भारताला विश्वगुरु बनवायचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रतन टाटांचा मेगा प्लॅन! एअर इंडिया पाठोपाठी ‘ही’ कंपनीही खरेदी करणार टाटा समुह
VIDEO: सुरक्षा रक्षकांना बगल देत मैदानात आला रोहित शर्माचा चाहता, डोकं टेकवून केला नमस्कार
सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका! हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढत केली नवीन लोकांची भरती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.