IND Vs ENG : सिराजने धरला कुलदीप यादवचा गळा, ड्रेसिंग रूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई | भारत आणि इंग्लड यांच्यात पहिला कसोटी सामना चेन्नई येथे खेळला जातो आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यात वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची मान पकडताना दिसत आहे. यावेळी सिराज प्रचंड रागात असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सिराजच्या या आक्रमक कृतीबद्दल विचारणा करत आहेत. तेसच त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फिरकीपटू नदीमला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी दिली. यामुळे अनुभवी कुलदीप यादवला अंतिम अकरात संधी मिळाली नाही. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजऐवजी इशांत शर्माला पसंती देण्यात आली आहे. मात्र ड्रेसिंग रूमच्या बाहेर घडलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

कुलदीप यादव आणि सिराज दोघेही चांगले मित्र असल्याचे बोलले जात होते. दोघांनी भारतासाठी, भारत अ आणि घरगुती क्रिकेटमध्ये अनेक सामने खेळले आहेत. यामुळे घडलेल्या या प्रकारावर लोकांना विश्वासत बसत नाही. आता संपुर्ण प्रकरणाचा खुलासा काय होतो हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच यासंदर्भात खेळाडूंवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतो आहे.

महत्वाच्या बातम्या-
विराटच्या ऐवजी अजिंक्य रहाणे कसोटी कर्णधार? अजिंक्य स्वत:च स्पष्ट म्हणाला..
मराठमोळा दिग्दर्शक सचिनवर भडकला; ‘माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण…..’
मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’
कन्यारत्न प्राप्तीनंतर अशी झाली अनुष्काची अवस्था; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.