HomeखेळVIDEO: निवृत्ती घेताच मोहम्मद हाफिजचा बोर्डावर हल्ला; म्हणाला, मी फिक्सर्सविरोधात आवाज उठवला...

VIDEO: निवृत्ती घेताच मोहम्मद हाफिजचा बोर्डावर हल्ला; म्हणाला, मी फिक्सर्सविरोधात आवाज उठवला तेव्हा बोर्डाने मला…

सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार ‘मोहम्मद हाफीज’ने निवृत्ती सोबतच आवाज उठवायला सुरुवात केली आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले. तो म्हणाला की मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंना न खेळू देण्याचे बोलले होते पण बोर्डाने त्याच्यासोबत अन्याय केला होता.

हाफिज म्हणाला, ‘माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी निराशा आणि वेदना तेव्हा होती जेव्हा मी आणि अझर अली यांनी या मुद्द्यावर एक तत्त्वनिष्ठ दृष्टीकोन घेतला पण बोर्ड अध्यक्षांनी आम्हाला सांगितले की जर आम्हाला खेळायचे नसेल तर काही हरकत नाही पण तो खेळाडू तर खेळेल.’

हाफिजने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, तो जवळपास दोन दशके पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळला होता. त्याने पाकिस्तानसाठी ३९२ सामने खेळले ज्यात त्याने १२,७८९ धावा केल्या आणि २५३ विकेट घेतल्या. हाफिजने पाकिस्तानसाठी ५५ कसोटी, २१८ एकदिवसीय आणि ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो ३ एकदिवसीय विश्वचषक आणि ६ टी-२० विश्वचषकांमध्ये पाकिस्तानकडून खेळला.

त्याच्या यशस्वी कारकिर्दीत, त्याला ३२ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तो शाहिद आफ्रिदी (४३), वसीम अक्रम (३९) आणि इंझमाम-उल-हक (३३) यांच्या मागे, चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय त्याला ९ वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला होता.

ताज्या बातम्या