नरेंद्र मोदींना नेतृत्व कसे करावे कळत नाही, मोदीजी राजीनामा द्या; कंगणाची धक्कादायक मागणी

देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील वातावरण चांगलच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. नेटकरी सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी मोदीचं समर्थन करत असते. मोदींवर टीका करण्यांचा ती चांगलाच समाचार घेत असते.  या ट्रोलर्सला पंगा क्वीन कंगणा राणावतने वेगळ्याच शैलीत उत्तर दिले आहे. कंगणाने एक प्रश्न पडणारं ट्विट केलं आहे. सध्या सोशल मिडियावर कंगणाच्या ट्विटची चर्चा रंगू लागली आहे.

‘मोदींना देशाचे नेतृत्व कसे करावे कळत नाही…कंगणाला अभिनय येत नाही…सचिनला बॅटिंग येत नाही आणि लता दीदींना गाता येत नाही…पण या चिंदी ट्रोलर्सला सर्व काही येते. मोदीजी राजीनामा द्या आणि विष्णु अवतारातील या ट्रोलर्सना देशाचे पंतप्रधान बनवा’. असं ट्विट कंगणा राणावतने केले आहे.

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असते. कंगणा बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते यांच्यावर नेहमी टीका करत असते. त्यामूळे बॉलिवूडमध्ये तिचे मित्र कमी आणि दुश्मनचं जास्त आहे.

कंगणा नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. कंगणाने शेतकऱ्यांवरही टीका केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सुध्दा कंगणाने निशाणा साधला होता. काही दिवसांपुर्वी कंगणाने पाकिस्तानची स्तुती केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी कंगणा तुझं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणतं ट्रोल केलं होतं.

कंगणा राणावतने फॅशन, गॅंगस्टर, शुट आऊट एट वडाळा, कट्टी बट्टी, मिले ना मिले हम, गेम यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. कंगणाला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

२३ एप्रिलला तिचा थलायवी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. यामध्ये तिने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या-
अवघड आहे! कोरोना पेशंटचे झाले लग्न; पीपीई किट घालून नवरी लग्नात आली
कोरोना लस किती कालावधीपर्यंत सुरक्षा देऊ शकते, वाचा संशोधक काय म्हणतात…
‘कुत्री भुंकत राहतात, करणारे आपले काम करत असतात’; कंगणा राणावत मोदींच्या पाठीशी
गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो आणि फक्त पोरींचे फोन उचलतो – एकनाथ खडसे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.