“मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”

मुंबई : “बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटले होते.

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्यावरुन अनेक मिम्सही तयार केले जात आहे.

अशातच सॅण्डअप कॉमेडी सादर करणाऱ्या कुणाल कामरानेही उडी घेत मोदींना लक्ष करणारं एक खोचक ट्विट केलं आहे. मोदीजी हे भारताला लाभलेलं सर्वोत्तम जागतिक नेते आहेत असं नरेंद्र मोदी म्हणालेत, अशा अर्थाचे ट्विट कुणाल कामराने केले आहे.

दरम्यान, मोदी विरोधकांनी पंतप्रधानांनी बांगलादेशमध्ये केलेला सत्याग्रह आंदोलनाचा दावा खोटा असल्याचे सांगत मोदींवर उपहासात्मक पद्धतीने टीका सुरु केली आहे. अगदी अमेरिकाचा शोध लागण्यापासून ते पहिलं, दुसरं महायुद्धामध्येही मोदींचा सहभाग असल्याचे ट्विट आणि मिम्स व्हायरल केले जात आहेत.

मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग?
पंतप्रधान मोदींनी हा खोटा दावा केल्याचा आरोप ट्विटरवरुन अनेकांनी केला आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनीच लिहिलेल्या पुस्तकामध्ये बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख सापडतो. याबाबत न्यूज १८ ग्रुपचे कार्यकारी संपादक असणाऱ्या ब्रिजेश कुमार सिंग यांनी ट्विट केले आहे.

सिंग यांनी मोदींनी लिहिलेलं पुस्तक पोस्ट केले असून त्यामध्ये मोदींनी गुजरातमधील संघर्षामधील अनुभव आहेत. या पुस्तकाच्या बॅक कव्हरवरील मजुकारचे भाषांतर, “आणीबाणीचे २० महिने, सरकारी कामकाजाचे अपयश सिद्ध करत भूमिगत चळवळीच्या माध्यमातून काम केलं आणि स्वत:मधील संघर्ष करण्याची वृत्ती कायम ठेवली. यापूर्वी आम्ही बंगलादेशच्या सत्याग्रहाच्या वेळी तिहार तुरुंगामध्ये जाऊन आलो,” असे आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग? समोर आला ‘हा’ महत्वाचा पुरावा

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात दहा दिवसांसाठी लाॅकडाऊन जाहीर

पुणे तिथे काय उणे! कमी खर्च अन् धुमधडाक्यात लग्न, पहा ट्रकवरील फिरतं मंगल कार्यालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.