आत्मनिर्भरची घोषणा देणाऱ्या मोदींकडूनच स्वतःसाठी अमेरिकेकडून विमान खरेदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवे व्हीव्हीआयपी बोईंग विमान ‘एअर इंडिया वन’ खरेदी करण्यात आले आहे. हे विमान पुढील आठवड्यात दिल्लीत येणार आहे.

हे विमान खुपच हायटेक पद्धतीने डिझाईन केले आहे. सरकारने दोन रूंद बॉडी असणारी खास डिझाईन केलेली बोईंग 777-300 ईआर विमाने ऑर्डर केली आहेत.

रिपोर्टनुसार हे बोईंग ‘एअर इंडिया वन’ विमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीसाठी वापरण्यात येणार्‍या ‘एयरफोर्स वन’ विमानाच्या धरतीवर बनवण्यात आले आहे.

ही विमाने अमेरिकेत तयार केली जात आहेत. दोन्ही विमाने पुढील आठवड्यात दाखल होताच व्हीव्हीआयपी ताफ्यातील 25 वर्षे जुने बोईंग 747 विमान हटवण्यात येईल.

एकीकडे आत्मनिर्भर भारताची घोषणा करायची आणि दुसरीकडे बाहेरून खरेदी करायची. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.