मोदींनी हॉकी सेमीफायनल मॅच पाहिली आणि भारत हरला, लोकं मोदींना म्हणाले, ‘पनवती’

टोकियो । सध्या टोकियोमध्ये ओलम्पिक स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये भारतीय खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसून येत आहेत. यामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ तब्बल ४९ वर्षानंतर सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी खेळ दाखवला होता. पण आज त्यांचा पराभव झाला.

बेल्जियम संघाने ५-२ च्या फरकाने भारताला पराभूत केले. आता मात्र अनेकांनी या पराभवाचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. नेटकऱ्यांनी थेठ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सामना सुरु असताना तो पाहत असल्याचे ट्विट मोदींनी केले होते. यामुळे ते आता ट्रोल केले जात आहेत.

अनेकजण म्हणाले की, त्यांनी सामना पाहिल्यानेच भारत पराभूत झाला, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी #Panauti हा ट्रेंड करत भारताच्या पराभवाला मोदींना जबाबदार धरले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

सामना सुरु असताना पीएम मोदी यांनी एक ट्विट केले होते, ‘मी भारत आणि बेल्जियम हॉकी पुरुष सेमीफायनल पाहत आहे. मला आपल्या संघावर गर्व आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा, असे ट्विट त्यांनी केले होते. मात्र त्याच कारणाने ते सध्या ट्रोल होत आहेत. मोदींनी सामना बघितला म्हणूनच आपण हरलो असे अनेकांनी म्हटले आहे.

भारताची कामगिरी बघता भारत आज देखील सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र भारताचा पराभव झाला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. आता कांस्य पदकासाठी भारतीय संघ सामना खेळणार आहे.

ताज्या बातम्या

VIDEO: अंडरवियरवर मासे पकडणं तरुणाला पडलं महागात, खेकड्याने धरला प्रायव्हेट पार्ट अन्…

मुकेश अंबानी खरेदी करू शकतात बर्गर आणि सँडविचची ‘ही’ कंपनी, टाटा कंपनीला देणार टक्‍कर

कपड्यांप्रमाणे हा माजी मंत्री बदलतो बायको, कारनामे ऐकून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.