“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात पॉवर, शिवसेनेत माज असायलाच हवा”

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली होती. यामुळे ते अजून चर्चेत आले. भाजपशी ते थेट पंगा घेतात. भाजप नेतृत्वावर टीका करताना ते कधी मागे पुढे बघत नाहीत.

आता देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर.

सुरुवातीचा काळ वेगळा होता, तेव्हा आम्ही हातात मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची. कारण त्यांना कळायचे हा शिवसैनिक आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे पुढे काही दिवसांनंतर गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचे प्रोटेक्शन आहे. यावेळी राऊत यांनी नारायण यांना देखील टोला लगावला.

राणे हे पहिले शिवसैनिक आहेत, शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी तो बदलत नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असेही राऊत म्हणाले.

सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. संजय राऊत अहमदनगर दौऱ्यावर होते, यावेळी ते बोलत होते.यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवत रचला इतिहास; भारताला मिळवून दिले सगल दोन पदक

हस्तमैथुनाची सवय बेतली जीवावर; ५१ वर्षांच्या माणसाने केले अतिप्रमाणात हस्तमैथुन अन् पुढे…

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.