“मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: कोरोना पसरवला, आणि आता रडत आहेत”

नवी दिल्ली । कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याची टीका विरोधक सतत करत असतात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांना रडू कोसळले. ते देशातील कोरोना परिस्थितीवर बोलत होते.

कोरोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींच्या डोळ्यात पाणी आले. आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी आपण नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असे सांगितले होते. काल नरेंद्र मोदी यांना रडू आल्याने चर्चेचा विषय ठरला. यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीमध्ये संजय यांनी, अजून थोडा दिवस वाट पाहा. ते तुमच्यासमोर येतील. ते लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील, असे म्हटले होते.

त्यांनी या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरे ठरले. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला.

ते आता रडण्याचे नाटक करत आहेत, असा टोला संजय यांनी लगवाला आहे. यामुळे आता त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून नरेंद्र मोदींवर सतत टीका केली जाते.

ताज्या बातम्या

फोर्डच्या या इलेक्ट्रिक कारने बाजारात घातला धुमाकूळ, एका दिवसात झाल्या २० हजार बुकिंग

माझ्या पार्थिवाला माझ्या पत्नीने अग्नी द्यावा आणि…; शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाने घेतली फाशी

पहा महिलेने कसा केलाय काचेच्या बाटल्यांवर बॅलन्स; व्हिडिओ पाहून तोंडात बोटं घालाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.