मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल

गांधीनगर। गुजरात राजकीय वर्तुळातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील.

भाजप नेते विजय रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यात अनेक बड्या नेत्यांची चर्चा नेत्यांच्या नावाची चर्चा होत होती. मात्र आज नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक घेण्यात आली.

गांधीनगरमध्ये भाजप कार्यालायात ही बैठक आयोजित आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. व त्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत. वास्तविक, विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या सीएम पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आज नवीन नाव निवडण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

व त्यानंतर कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया,उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मंत्री पुरुषोत्तम रूपाला गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील तसेच राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील.

भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे समजले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: नाकात नथ, अंगावर नऊवारी साडी; गणपती बाप्पाच्या आगमानानिमित्त राजेश्वरी खरातचे खास नृत्य 
मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ
“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार” 
काय डोकं आहे! चक्क फिल्मी अंदाजात चमचाने बोगदा खाणुन कैदी तुरुंगातुन फरार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.