मोदी बकरा होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल, किंमत वाचून बसेल धक्का…

सांगली । कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून जनावरांचा बाजार बंद होते. मात्र आता ते सुरू झाले आहेत. सांगलीतील आटपाडीमध्ये अशाच एका बकऱ्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मोदी बकरा असे या बकऱ्याचे नाव आहे.

या बाजारात तशा तर अनेक मेंढ्या, जनावरे विक्रीसाठी येतात मात्र या मोदी बकर्‍याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाजारात या बकर्‍याला तब्बल 70 लाखाची मागणी आली. मात्र मालकाने बकरा विकण्यास नकार दिला. कारण या बकर्‍यासाठी मालकाला दीड कोटी रुपये अपेक्षित आहेत. हा बकरा या बाजारातील चर्चेचा विषय ठरला आहे.

येथील जनावरांच्या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी आपल्या मोदी बकर्‍यासह दाखल झाले. ७० लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकला नाही.

याच बाजारात आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला १३ लाख रुपये इतकी मागणी झाली. ही मेंढी प्रसिद्ध मोदी बकऱ्याचे पिल्लू आहे. यामुळे या मोदी बकऱ्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

सोशल मीडियावर देखील या बकऱ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या बकऱ्याच्या मालकाने सांगितले की अपेक्षित किंमत आली तरच हा बकरा विकला जाईल, आता किती रुपयांना हा बकरा विकला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.