बाॅलीवूड ड्रग्ज प्रकरण; केंद्र सरकार मोदींशी संबंधीत मोठ्या अभिनेत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात

ड्रग प्रकरणात अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुरू पोलिसांनी छापा टाकला होता. पण या प्रकरणात अद्याप नार्कोटिक्स विभागाने विवेकला चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. यावर राज्य सरकारने नार्कोटिक्स विभाग विवेकची चौकशी करणार नसेल तर मुंबई पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करतील असा पवित्रा घेतला आहे.

सँडवूड ड्रग प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. यातलंच एक नाव म्हणजे आदित्य अल्वा. आदित्य विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. पण तो सध्या गायब आहे.

पोलिसांना खबर मिळाली होती की, तो मुंबईत विवेकच्या घरी आहे. म्हणून कर्नाटक पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. पोलीस मुंबईत पोहोचले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घराची तपासणी सुरू केली आहे. पण एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली नाही.

विवेक ओबेरॉय भाजपशी संबंधित आहे. म्हणून एनसीबीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘विवेक ओबेरॉयबद्दल सगळी माहिती राज्य सरकारने एनसीबीला दिली आहे. जर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस चौकशी करेल.’

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने मुख्य भुमिका साकारली होती. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील अनेक घटना दाखवण्यात आल्या आहेत.

कंगना राणावतनंतर विवेक ओबेरॉयवरून परत एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने सामने येईल असे दिसत आहे. आदित्य अल्वा विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या अगोदर कंगनामूळे असे चित्र उभे झाले होते.

सँडलवूड म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग प्रकरण देखील समोर आले आहे. यामध्ये कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात अभिनेत्री रागिनी द्विवेदीचे नाव समोर आले होते. त्यानंतर आदित्य अल्वाचे नाव समोर आले आहे. आदित्य अल्वा बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या पत्नीनीचा भाऊ आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत

हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे बंद करून दाखवावेत

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

सर्वांची पोल खोलणाऱ्या करण जोहरला सलमान खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.