आता मोदींनी सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा फुलफॉर्म, वाचा काय आहे?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा अर्थ सांगितला. तसेच भाषणात विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोनाकाळातील कामगिरीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावातील प्रत्येक अक्षराचा फूलफॉर्म सांगितला आहे.

सुशील मोदी म्हणाले की N म्हणजे New india, A म्हणजे Aatm nirbhar bharat, R म्हणजे Ready for reforms, E म्हणजे Electronic agri market, N म्हणजे New financial structure, D म्हणजे Disinvestment, R म्हणजे Railway and roads, A म्हणजे Agriculture reforms असं ते म्हणाले.

M म्हणजे msp assured, helping migrant worker, O म्हणजे One person company, D म्हणजे Down to earth, I म्हणजे Inclusive development असा फूलफॉर्म सांगितला आहे. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही त्यांना साथ दिली आहे.

सुशील कूमार मोदी पूढे म्हणाले की, विरोधकांकडून जनधन खात्याची खिल्ली उडवली जाते. पण जन धन खातं नसतं तर कोरोनासारख्या महामारीत गोरगरीबांना पैसे केंद्र सरकारने कसे पोहोचवले असते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

म्हत्वाच्या बातम्या-
सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; बंद केली ५०० हून अधिक अकाऊंट्स
भाजपा नेत्याचं गृहमंत्र्यांना पत्र; ‘भारतरत्नां’च्या चौकशीचे आदेश मागे घ्या; आधी ‘त्या’ सेलिब्रिटींना धरा
… आणि दोन्ही वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकटीने पुढे आली; सेनेच्या वाघाचं शाहंना रोखठोक उत्तर
दिसशील तिथे फटके देणार, शिवसेना खासदाराला भाजप नेत्याची गंभीर धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.